ध्यास विश्वसार्ह बातमीचा

46 रुपयांचे तरी काम दाखवा आणि 1 लक्ष रुपयाचे बक्षीस घ्या ; विरोधी पक्षनेत्यांचे आवाहन !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या जनसंदेश संबोधात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या पैकी 29 हजार कोटींचे कामे पूर्णत्वाकडे गेले असल्याचे सूतोवाच केले.याला आव्हान देत मुख्यमंत्र्यांनी पूर्ण झालेल्या कामांची यादी जाहीर करावी असे, आवाहन दानवे यांनी केले आहे.

गतवर्षी संभाजीनगरात मराठवाडा विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी 46 हजार कोटी रुपयांची विकासात्मक कामांसाठी घोषणा केली होती. एक वर्षपूर्ती नंतर या घोषणा केलेल्या पैकी 46 रुपयांचे तरी काम दाखवा आणि 1 लक्ष रुपयाचे बक्षीस घ्या असे आव्हान शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

मगील एका वर्षात मराठवाड्यात कोणत्याही प्रकारचे एकही काम मंत्रीमंडळ बैठकीत घोषीत केलेल्या योजनांपैकी सुरू नाही. प्रत्यक्षात कोणीही माहिती घेऊन ही बाब तपासून बघू शकते. मुख्यमंत्र्यांनी आजच्या संबोधनात 29 हजार कोटींचे कामे सुरू असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात अशी स्थिती असेल तर राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढावी असे जाहीर आवाहन देऊन मी खात्रीपूर्वक सांगतो की एकही काम पुर्ण झाले नसेल अशी, टीकाही अंबादास दानवे यांनी केली. मराठवाड्याला आताचे सत्ताधारी गृहीत धरत नसून गतकाळात याच क्रांतिकारी भूमीने रझाकाराला पाणी पाजले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खोटी आणि फसवणूक करणारी माहिती देऊ नये अन्यथा रझाकाराप्रमाणे आपल्यालाही आगामी काळात मराठवाड्यातील जनता पाणी पाजेल अशी भूमिका, दानवे यांनी यावेळी मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!