---Advertisement---

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने लाडक्या बाप्पांना दिला निरोप !

By team
On: September 17, 2024 2:07 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अनंत चतुर्थीच्या दिवशी न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या श्रींचे मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे व सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते पूजन करून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अशा नाम गजरात बप्पांचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

गेल्या नऊ दिवसापासून श्रींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत होते. शमी वृक्षाखाली गेल्या ३४ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमी विघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

याप्रसंगी न्यासाचे रामचंद्रराव घाडगे, शिवाजी उपरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, महादेव अनगले, बाळासाहेब घाडगे, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, रोहन शिर्के, गोरख माळी, बबुशा महिंद्रकर, विश्वनाथ कलशेट्टी, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अतिष पवार, मुन्ना कोल्हे, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, विठ्ठल रेड्डी, किरण साठे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!