गुरुग्राम : गुरुग्राममधील सेक्टर-४९ मधील घसौला गावाजवळील रिकाम्या जागेत बांधलेल्या झोपडपट्टीला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. झोपडपट्टीत ठेवलेल्या छोट्या-छोट्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग झपाट्याने वाढू लागली. काही वेळातच २०० झोपड्या जळून राख झाल्या आणि शेकडो कुटुंबे बेघर झाली. अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र तोपर्यंत २०० हून अधिक झोपड्यांची राख झाली होती.
गुरुग्राममधील सेक्टर ४९ मध्ये दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत २०० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत अनेक सिलिंडर्सचा स्फोट झाल्याने आग वाऱ्यासारखी पसरली. आपल्या डोळ्या देखत घर जळत असल्याचे पाहून लोकांनी हंबरडा फोडला. अनेक लोकांची आयुष्यभराची कमाईही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. कडाक्याच्या थंडीत लोकांची घरे जळाल्याने संकटांचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात सुमारे डझनभर लोख जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.