---Advertisement---

पालापूरच्या उपसरपंचपदी संतोष जगताप यांची बिनविरोध निवड

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट – तालुक्यातील पालापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच बाबन जमादार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. यामध्ये परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे संतोष जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक बिटगीरी व लिंगराज व्हनशेट्टी यांनी सहकार्य केले.

नूतन उपसरपंच संतोष जगताप यांनी बोलताना म्हणाले की, पालापूरच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच बाबन जमादार , उपसरपंच संतोष जगताप ग्रामपंचायत सदस्य फरीदा जमादार, कस्तुरा कलकुटगे, अंकुश देडे, छायाबाई पाटील, मलय्या बिळंबे, विठाबाई जगताप आदी उपस्थित होते. उपसरपंचपदी संतोष जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरपंच बाबन जमादार यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करुन पेढ भरविण्यात आले.

याप्रसंगी प्रकाश घोडके, हणमंत बंमगोळ, अप्पू बंबगोळ, वालचंद गायकवाड, सचिन जगताप, प्रकाश कलकुटगे, सुधाकर कलकुटगे, संदीप पाटील, विठ्ठल पाटील, पाशा जमादार, पैगंबर जमादार, ईस्माईल जमादा , मुन्ना गोलंदाज, संजय कोकरे, राजू देडे, तायप्पा देडे, हुंडप्पा पाटील, आनंद अंकलगे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!