---Advertisement---

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.14 : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रविवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर, सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मुख्य शासकीय समारंभाच्यावेळी दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ घेण्यात येऊ नये. एखाद्या संस्थेला अथवा कार्यालयाला ध्वजारोहण कार्यक्रम करावयाचा असल्यास सकाळी 8.35 पूर्वी अथवा 9.35 नंतर करता येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!