मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही घेतला वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय
मुंबई : मध्य प्रदेशच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून (Marathi) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठी भाषेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. एमबीबीएस किंवा मेडिकल यासारख्या शाखांचं शिक्षण इंग्रजी भाषेतूनच दिलं जाणार आहे, मात्र, विद्यार्थांना विषय समजून घेता यावा, यासाठी संबंधित विषयांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद केला जाणार आहे.
सदर योजनेची माहिती देताना गिरीश महाजन म्हणाले, एमबीबीएस, मेडिकलनंतर नर्सिंग, डेंटल अशा अभ्यासक्रमाचं टप्प्याटप्प्याने अनुवाद करण्यात येणार आहे. यावर्षी एमबीबीएसचा अभ्यासक्रम मराठीतून अनुवाद केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही अभ्यासक्रम मराठीत अनुवाद केले जातील.
पुढील वर्षापासून विद्यार्थांना संबंधित पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण हे इंग्रजीतच असणार आहे. पण ते विद्यार्थांना समजण्यासाठी सोपं जावं म्हणून त्याचा मराठीत अनुवाद केला जाणार आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली