---Advertisement---

नागपूरातील मिहानमधील सॅफ्रन ग्रुपचा ‘’हा प्रकल्प’’ हैदराबादमध्ये जाणार असल्याची माहिती

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : काही दिवसांपूर्वीच दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ऐनवेळी गुजरातमध्ये हलवण्यात आला होता. त्यानंतर आता नागपूरात प्रस्तावित असेलला टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातच्या वडोदऱ्यात हलवण्यात आला आहे. त्यानंतर आता राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं यावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरातील मिहानमधील सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प तेलंगणाच्या हैदराबादमध्ये जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल १ हजार १८५ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणार असल्यानं यावरून विरोधक शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. विदर्भात आधीच रोजगाराची वानवा असताना एकामागून एक दोन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्यानं तरुणांमध्ये आक्रोश असल्याचं पाहायला मिळत आहे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!