ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

पुणे : वृत्तसंस्था

जी आणि आयआयटी परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातून समोर आला आहे. खेड तालुक्याच्या कडूस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून २७विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, कडुस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये देशातील विविध राज्यातून JEE आणि IIT अशा विविध पूर्वपरीक्षांच्या तयारी अभ्यासक्रमासाठी निवासी आहेत. काल रात्री बटाटा भाजी चपाती, डाळ भात असा जेवनाचा मेन्यू होता. ज्यातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. काल रात्री ५५० विद्यार्थ्यांनी हे जेवन केले होते. ज्यानंतर अनेकांना जुलाब, उलटीचा त्रास जाणवू लागला. याामध्ये २७ विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राजगुरुनगर पोलिसांसह डॉक्टरांची टिम चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली आहे. काही मुलांना ऑक्सिजन लावण्यात आले आहेत. विषबाधा झाल्याने सर्व विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

\

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!