मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र अवघ्या काही वेळातच न्यायालयाने त्यांच्या जामिनाला दहा दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दहा दिवस तरी तुरुंगातच राहाव लागणार आहे.
मनी लाँड्रिंग व भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुख हे मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून तुरुंगात आहेत. त्यांच्या विरोधात ईडीनं मनी लाँड्रिंगचा तर, सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी ईडीच्या गुन्ह्यात त्यांना आधीच जामीन मंजूर झाला आहे. तर, सीबीआयच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी सीबीआयनं वेळ मागितली आहे. त्यानुसार न्यायालयानं सीबीआयला १० दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळं जामिनाची अंमलबजावणी आणखी दहा दिवस लांबणीवर पडणार असून तोपर्यंत अनिल देशमुख यांना आतच राहावं लागणार आहे.