ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वीज पुरवठा वारंवार खंडित ; अक्कलकोटकर आंदोलनाच्या तयारीत

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

महावितरणचा भोंगळ कारभार सध्या अक्कलकोट शहर आणि तालुक्यात अनुभवायला मिळत आहे याबद्दल सध्या नागरिकांमध्ये तीव्र रोष असून नागरिक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत अक्कलकोट शहरात गेल्या आठवड्यापासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.ऐन निवडणुकीत सर्वजण प्रचारात असताना असा प्रकार सुरू झाल्याने हा विषय ग्रामीण भागात सुद्धा चर्चेचा बनला आहे.

आता तरी महावितरणचे अधिकारी लक्ष देतील का,असा प्रश्न विचारला जात आहे.भर उन्हाळ्यात अक्कलकोट शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. काही ठिकाणी मेंटेनन्सच्या नावाखाली वीज बंद ठेवली जात आहे.शहरातील भीम नगर,नाईकवाडी गल्ली, बेडर गल्ली,मौलाली गल्ली,माणिक पेठ,जनता चाळ,बेडर गल्ली,राजीव नगर झोपडपट्टी या परिसरातील वीज नेहमीच खंडित होत असते. १८ एप्रिल रोजी दुपारच्या साडेचार वाजता लाईट बंद झालेली रात्री ११:३० वाजता आली तेही ह्या परिसरातील लोकांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन गोंधळ आणि तक्रार केल्यानंतर लाईट चालू करण्यात आली.महावितरणचा फोन लाईट बंद झाल्यावर मुद्दामून बंद केला जातो किंवा फोन उचलत नाहीत किंवा काढुब ठेवतात.

पिठाच्या गिरण्या,ऑनलाइन कामे करणारे, विद्युत काम करणारे सर्वच उपकरणे कामे करताना लाईट बंद चालूमुळे हैराण होत आहेत. लाईट बिल एक दिवस जरी उशिराने भरणा केले तर विज पुरवठा खंडीत करणारे , वारंवार वीजपुरवठा गायब होत असताना काय करतात, असा सवाल अक्कलकोट शहरातील नागरिक विचारत आहेत.परवा तर महावितरण कार्यालयामध्ये संध्याकाळी ७ ते ११ पर्यंत नागरिकांनी महावितरणमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना महावितरणच्या भोंगळ कारभारावर जाब विचारला आणि नाराजी व्यक्त केली.संबंधित अधिकारी वर्गाने या परिस्थितीची वेळीच दखल घ्यावी अन्यथा अक्कलकोट शहरातील जनतेचा उद्रेक होऊन त्याचा रोष महावितरणला सहन करावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!