ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधिवत पूजा करीत गडकरी यांचे शक्तिप्रदर्शन

नागपूर : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असून भाजपने राज्यात पहिला अर्ज देखील भरला आहे तर आज केंद्रीय मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यापूर्वी त्यांनी आपल्या निवासस्थानी विधिवत पूजा करत मिरवणूकीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

नितीन गडकरी यांनी संविधान चौकातून मिरवणुकीला सुरुवात केली असून आकाशवाणी चौकात ते जनतेला संबोधित केले आहे. मिरवणुकीत भारतीय जनता पक्षासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नागपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये नितीन गडकरी यांचे मोठे वर्चस्व आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत का नाही? असा प्रश्न विचारात विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना महाविकास आघाडी येण्याचे थेट आमंत्रण देखील दिले होते. मात्र, यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नितीन गडकरी यांनी नकार दिला होता. उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!