ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महापुरुषांच्या विचाराचा राज्यकर्त्यांना पडला विसर; कुरनूर येथील व्याख्यान कार्यक्रमात प्रा.बनबरे यांचे प्रतिपादन

 

सचिन पवार

कुरनूर, दि.२१ सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्यानंतर संधी मिळाली तर सर्वोच्च पदावर जाता येते.त्याला कुठल्याही साधू अथवा देवतांची गरज भासत नाही. आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण जगावर राज्य करू शकतो. कष्टाने आणि श्रमानेच माणूस मोठा होतो.
हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला समजते,असे प्रतिपादन प्रा.गंगाधर बनबरे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुरनूर (ता.अक्कलकोट) येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल हिप्परगे होते. पुढे बोलताना बनबरे म्हणाले
की,लोकशाहीत वावरत असताना शाहू,फुले आंबेडकरांचे विचार आत्मसात केले पाहिजे तरच समाजाची प्रगती होणार आहे.आज समाज भरकटत चालला आहे.विशिष्ट विचारधारा समोर येत आहे.ही विचारधारा जाणीवपूर्वक लोकांमध्ये आणून संभ्रमावस्था निर्माण करून संविधानालाही मागे टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.हा प्रयत्न सर्वांनी मिळून एकत्रित हाणून पडला पाहिजे, मुळात
आत्ताच्या राज्यकर्त्यांना महापुरुषांच्या विचारांचा विसरच पडला आहे,असेही ते म्हणाले.यावेळी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, अमोल हिप्परगे,तुकाराम दुपारगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मराठा
सेवा संघाचे राम गायकवाड, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रकाश सुरवसे,अतुल जाधव, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे, तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे,ग्रामपंचायत सदस्य राजकुमार गवळी,विनायक जाधव,अर्जुन साळुंखे
आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पप्पू कांबळे, हरी वाघमारे,पोपट गायकवाड,नेताजी वाघमारे,सागर बनसोडे, तुकाराम कांबळे,नागनाथ जांगटे, मोहन गायकवाड,बापू कांबळे,अमित गवळी, नितीन दगडे आदी नवयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगंबर जगताप व सचिन पवार यांनी केले.आभार तुकाराम जावीर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!