गोकुळ शुगरसाठी १८ लाख मॅट्रिक टन उसाची नोंद,मिल रोलर पूजनाप्रसंगी कार्यकारी संचालक कपिल शिंदे यांची माहिती
अक्कलकोट, दि.२ : धोत्री येथील गोकुळ शुगरला २०२२ -२३ च्या गळीत हंगामासाठी १८ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाची नोंद झाली असून येणाऱ्या हंगामात विक्रमी गाळप करण्याचा मानस असल्याचे कार्यकारी संचालक कपिल शिंदे यांनी सांगितले.
कारखाना कार्यस्थळावर गोकुळ शुगरच्या गळीत हंगामाची तयारी आता सुरू झाली असून त्याच्या मिल रोलरचे पूजन माजी सभापती कल्याणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, चेअरमन दत्ता शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गोकुळ कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस नोंद केली आहे.त्याचे गाळप करण्याच्या दृष्टीने कारखान्याने तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार केले आहेत. कारखान्याच्या मागील गळीत हंगामात कार्यक्षेत्र आणि मराठवाड्यातून जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न कारखान्याने केला. गेल्या हंगामातील उसाची बिले, तोडणी वाहतूक यंत्रणेची बिले वेळेवर दिले असून कामगारांचे वेतन वेळेवर करण्यात येत आहेत. येणाऱ्या गळीत हंगामात देखील जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा मानस कारखाना व्यवस्थापनाचा आहे,असे शिंदे यांनी सांगितले.गेल्या वर्षी ७ लाख ७१ हजार २७३ मेट्रिक टन उसाचे गाळप
झाले होते.साखरेचे उत्पादन ७ लाख ५८ हजार
४२० क्विंटल झाले होते.यामुळे कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे कार्यकारी संचालक शिंदे यांनी सांगितले.यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे,जनरल मॅनेजर प्रदीप पवार,वर्क्स मॅनेजर राजकुमार लवटे,मुख्य लेखा अधिकारी उमेश पवार,चीफ केमिस्ट दिलीप गुळदगड,पर्चेस ऑफिसर अरविंद जंगाले, मुख्य शेती अधिकारी फकरोद्दीन जहागिरदार यांच्यासह कारखान्यातील विविध विभागाचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.