---Advertisement---

नूतन आमदार कल्याणशेट्टी यांचा रोहिदास राठोड मित्र परिवारातर्फे सत्कार

By team
On: November 29, 2024 6:03 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट वृत्तसंस्था  

 

अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांची विक्रमी मताने सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे कार्यकारी संचालक रोहिदास राठोड व मित्र परिवाराच्या वतीने अक्कलकोट येथे सत्कार करण्यात आला. आमदार कल्याणशेट्टी यांनी गेल्या वेळेच्या निवडणुकीतील विक्रम त्यांनी स्वतःच मोडत यावेळी ४९ हजार ५०० मताने ते निवडून आले आहेत.

तालुक्यात आरोग्य, रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधा याबाबतीत कल्याणशेट्टी  यांनी मोठे काम केल्यामुळे त्यांच्या मतांमध्ये भरघोस वाढ झाली आहे.या माध्यमातून त्यांची तालुक्यावर असलेली पकड लक्षात येत आहे. भावी काळात ते मंत्री देखील होतील आणि तालुक्याचा या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास होईल. त्यांना आमच्या शुभेच्छा राहतील,असे रोहिदास राठोड यांनी सांगितले.

आमदार कल्याणशेट्टी यांच्या विजयात बंजारा समाजाचे देखील मोठे योगदान आहे.हा समाज देखील त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केला आहे, असेही ते म्हणाले. याबद्दल आमदार कल्याणशेट्टी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी अप्पा चव्हाण, पप्पू राठोड़, आकाश राठोड़, आनंद राठोड़, दिपक चव्हाण, अंबादास राठोड़ आदिंसह भाजपचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!