मुंबई : वृत्तसंस्था
खरीप हंगाम २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज दि. ३० राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २ हजार ३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.
देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून राज्य सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता- गोमाता’ म्हणून घोषित केले आहे. सोमवारी (दि. ३०) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला असून पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याचा सरकारचा उद्देश आहे.