अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने स्थापन झालेल्या व परमपूज्य सद्गुरू बेलानाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या राजेराय मठात श्री स्वामी समर्थांचा १४६ वा पुण्यतिथी उत्सवाची सांगता बेला समर्थ महिला भजनी मंडळाच्या भक्ती संगीताच्या सोबत गोपाळकाल्याने झाली.
२४ एप्रिल ते ७ मे दरम्यान आयोजित धर्मसंकीर्तन सोहळ्यात दररोज सकाळी ८ ते १२ दरम्यान श्री गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण सौ.ज्योती झिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुसंख महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सायंकाळी ५ ते ७ दरम्यान दररोज अक्कलकोट, सोलापूर, बेळगाव, मुंबई येथील भक्तमंडळींनी भक्ती संगीत, भारूड इत्यादींच्या माध्यमातून सेवा रुजू केली. याच दरम्यान सप्ताह भर अखंड नामविना सप्ताह चालू होता. दिनांक ६ मे मुख्य उत्सवा दिवशी पहाटे २ ला काकडा आरती २ .३० वा. मठाचे उपाध्यक्ष विकास दोडके यांचे उपस्थितीत भक्तांकडून करण्यात आली. सकाळी १० वाजता.मठाचे अध्यक्ष ॲड.शरद फुटाणे यांच्या उपस्थितीत श्रींच्या पादुकावर व परमपूज्य सद्गुरु बेलानाथ बाबाच्या समाधीवर सामुदायिक अभिषेक करण्यात आला.
दुपारी १२ वाजता सर्व विश्वस्त मंडळ व भक्तांच्या उपस्थितीत महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अक्कलकोट, सोलापूर, बरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून भक्तगण आले होते. सायंकाळी ६ला श्रींच्या पालखीची सुरुवात विश्वस्तांच्या उपस्थितीत आरती करून करण्यात आली. सनई चौघडा बँड दिंडी महिलांचा नाम गजर पथकासोबत श्री राजेराय मठापासून निघालेली पालखी एवन चौक, विजय कामगार चौक, खासबाग मार्गे समाधी मठातील आरतीनंतर कारंजा चौक, मेन रोड, सेंट्रल चौक, फत्तेसिंह चौक, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात आरती करून शहाजी हायस्कूल पागा चाळ मार्गे राजेराय मठात आली. या पालखीसोबत ठाणे येथील स्वामी दरबार संस्थेतील कलावंत मयुरेश कोटवर यांनी श्री स्वामी समर्थांचा सेवकऱ्यासमवेत असलेला जिवंत देखावा सादर केला होता. पालखी मार्गावर जागोजागी भक्तगणांनी आरती करून प्रसाद पाण्याची सोय केली होती.
मिरवणुकी सोबत मठाचे उपाध्यक्ष विकास दोडके, विश्वस्त ॲड.अनिल मंगरुळे,विजयकुमार गाजूल , दत्तात्रय मोरे सचिव प्राचार्य डॉ. किसन झिपरे, ॲड. विकास फुटाणे याचबरोबर सोलापूरचे वज्रेश्वरी गाजूल यांचे सेवेकरी मंडळ तसेच मठातील बेला समर्थ भजनी मंडळ, पारायण मंडळ असंख्य भक्तांनी सहभाग घेतला होता. सदरचा उत्सव यशस्वी करण्यासाठी ज्योती झिपरे,सुजाता दोडके, प्रा. ओम प्रकाश तळेकर,सुदाम चव्हाण, सुरेश डिग्गे,पद्माकर डिग्गे,महेश कलशेट्टी, ॲड.श्रद्धांक झिपरे ,किशोर सूर्यवंशी,वैशाख डीग्गे, संजय हरकुड,विलास तलवार,अनंत शिंदे ,सतीश पाटील, धनंजय गायकवाड, नमित झिपरे, ओंकार दोडके, अक्षय गव्हाणे मठातील विद्यार्थी सर्व सेवेकरी सोलापूर आंध्र भद्रावती पेठेतील भक्त मंडळांनी विशेष प्रयत्न केले.