मुंबई : वृत्तसंस्था
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले की, सरकारला राहुल गांधी यांची कोणतीही भीती नाही. त्यांच्या मते, राहुल गांधी फक्त कॉमेडी करतात, त्यांना गुप्तचर विभागाची किंवा प्रशासनाची माहिती नसल्यामुळे सरकारला त्यांच्या पलीकडे काहीही घाबरण्याची गरज नाही.
नवनाथ बन यांनी उबाठा गटावरही टीका केली, असे म्हणत की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली गुडघे टेकले असून त्यांना घाबरण्याची गरज आहे. “जगात इराण-इस्रायल युद्ध सुरु असतानाही सर्वात सुरक्षित देश भारत आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, उबाठा गटात राऊत सुरक्षित नाही, आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ते स्वतःला गुलाम मानत असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेले आहेत. “षंढांना बोलण्याचा अधिकार नाही; शांतता आणि सामर्थ्य हे फक्त सामर्थ्यवान लोकांच्या हातात असते,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी अजित पवार विमान अपघात प्रकरण बाबतही स्पष्ट केले की, या प्रकरणी कोणही दोषी असेल तर कारवाई केली जाईल. राऊतांनी प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करणं बंद करावे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सक्षम आहे, असेही नवनाथ बन यांनी सांगितले. नवनाथ बन यांनी उबाठा गटाच्या वर्तनावर टीका करत सांगितले की, “राऊत गुलामगिरीची सवय लागल्यामुळे बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. जनतेने त्यांना ठरवले आहे; म्हणून त्यांना षंढाची भाषा करू नये,” असे स्पष्ट केले.