मुंबई दिनांक २८: कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले.
कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे. नाफेडकडून कांदा खरेदी सुरु- विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे pic.twitter.com/UeEelxxNDc
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 28, 2023
मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. २.३८ लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला आहे. जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल . कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना सुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.