---Advertisement---

मतमोजणीच्या आधीच झळकले कसब्यातील दोन्ही उमेदवारांचे विजयाचे बॅनर, कोण मारणार बाजी..?

Follow Us:
---Advertisement---

पुणे : पुण्यात सध्या बॅनर वार पाहायला मिळत आहे. कसबा पेठ मतदार संघासाठी रविवारी पोटनिवडणूक पार पडली त्याचे निकाल ०२ मार्चला म्हणजेच गुरुवारी होणार आहे. आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहेत. मात्र कसबा पेठ मतदार संघाततील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचे मतमोजणीच्या आधीच विजयाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे नेमके कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ५०.०६ टक्के मतदान झालं आहे. या मतदारसंघामध्ये एकूण २,७५, ६७९ एवढे मतदार आहेत, कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी लढत झाली होती. आता भाजप कसबा पेठ भाजपचा बाले किल्ला मनाला जातो यामुळे भाजप आपला मतदार संघ राखणार का? महाविकास आघाडी उमेदवार बाजी मारणार हे पहाव लागणार आहे.

रवींद्र धंगेकर आणि विजयाचे बॅनर वडगावमध्ये लावण्यात आले आहेत. रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे. तर हेमंत रासने यांच्या बॅनर मध्ये असे लिहिण्यात आले आहे की, आमदार हेमंत (भाऊ) रासने यांचा कसबा पोटनिवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन असे लिहिण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!