ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यपाल नियुक्त आमदारांचा झाला शपथविधी

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी या नावांना मंजूरी दिली होती. या आमदारांचा आज शपथविधी झाला.

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी या नावांना मंजूरी दिली होती. या आमदारांचा आज शपथविधी झाला.

महाविकास आघाडीने जून 2020 मध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही नियुक्त्या दिल्या नाही. कोश्यारी मुद्दामहून अडवणूक करत आहेत, असा आरोप करत कोल्हापूर येथील सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्यात जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सत्ता परिवर्तन झाले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार आले. त्यामुळे आधीच्या आमदारांची यादी बारगळली. आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा मुद्दा धसास लावण्याचा प्रयत्न करण्यात येत असून महायुतीच्या वतीने 7 जणांच्या नावाची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!