अक्कलकोट, दि.४ : द मार्केटिंग फेडरेशन लि. सोलापूर व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी किणी अंतर्गत अक्कलकोट येथे हरभरा शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
सध्या हरभऱ्यांचा शासकीय हमी भाव ५ हजार ३३५ रूपये इतका आहे.तरी तालुक्यातून सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन हरभरा खरेदीकेंद्रावर करून घ्यावे.शेतकऱ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी चालु वार्षाचे पिक पेरा नोंद असलेला ७/१२ उतारा (ई पिक पाहणी, ८ अ, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स,कार्यरत असलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. तरी तालुक्यातून सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन किणी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वैजिनाथ अळळीमोरे मोबा. (९९७५११९९४४ ) यांनी केले आहे.