ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डे नाईट हॉलीबॉल स्पर्धेत गुलबर्गा संघाने मारली बाजी

अक्कलकोट : प्रतिनिधी

केसर जवळगा येथे स्वर्गीय पत्रकार जावेदमियां पीर साहेब इनामदार यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त आयोजित निमंत्रित डे नाईट हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन श्री विरंतेशवर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष संताजी काका चालुक्य उमरगा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शहाजी भैय्या पाटील धाराशिव भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार भारतीय जनता पार्टीचे उमरगा तालुका उपाध्यक्ष शेखरजी मुदकन्ना जकेकुरचे सरपंच अनिल बिराजदार ज्येष्ठ नेते बाबासाहेब डांगे सोसायटीचे चेअरमन श्रीमंत भुरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापूराव जी पाटील उपाध्यक्ष बालाजी दादा राजपूत माजी सरपंच अमोल पटवारी उपसरपंच अझर इनामदार भारतीय जनता पार्टीचे उमरगा तालुका उपाध्यक्ष लोकेश बिराजदार मुरूम भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष दिलीप जी इंगोले कल्याणी बिराजदार शब्बीर इनामदार शंकर व्हटे सुभाष भुरे माजी उपसरपंच शिवशंकर कनमुसे शशिकांत डांगे संजीव पाटील ग्रामसेवक रतन सिंग राजपूत दत्ता घोडके शिवशंकर कणमुसे चंद्रकांत पाटील सतीश डांगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड एस पी इनामदार यांनी केले व आभार रमेश भुरे यांनी केले तत्पूर्वी उद्घाटन झाल्यानंतर सामन्यांना सुरुवात करण्यात आली हॉलीबॉल स्पर्धेत सोलापूर लातूर गुलबर्गा वडवणा नेकनुर आलुर आजी संघाने सहभाग घेतला होता.

प्रथम पारितोषिक भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अभयराजे चालुक्य यांच्यातर्फे 15000 ची पारितोषिक होते व द्वितीय पारितोषिक छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था उमरगा चे उपाध्यक्ष बाबासाहेब डांगे यांच्यातर्फे होते स्पर्धेचा अंतिम सामना हा गुलबर्गा आणि वाढवणा यांच्यात झाला या सामन्यात गुलबर्गा संघाने विजय संपादन केला प्रथम पारितोषिक गुलबर्गा संघाला देण्यात आला व द्वितीय वडवण्या संघाला पारितोषिक देण्यात आला स्पर्धेचे पंच म्हणून श्री सदानंद बिराजदार श्री मुनीर शेख श्री लक्ष्मण देवकर श्री रमेश भुरे श्री योगेश कोडलं गरे धनंजय बनसगोळे यांनी काम पाहिले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदुस्तान हॉलीबॉल संघाचे खेळाडूंनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात स्वर्गीय पत्रकार जावेद मिया पीर साहेब इनामदार यांच्या आठवणींना लेखणीला उजाळा देण्यात आला या स्पर्धेत लिंगगैक जडीबसवलिंगेश्वर महास्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आप्पाजी चषक घेण्यात आले होते त्या चषकाचे बक्षीस वितरण करण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!