---Advertisement---

हंजगी ग्रा.पं निवडणुकीत श्री बम्मलिंगेश्वर ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व;दोन अपक्ष उमेदवार पहिल्यांदाच विजयी

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत श्री बम्मलिंगेश्वर ग्रामविकास पॅनेलने नऊ पैकी सहा जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे.इकडे पाच अपक्ष उमेदवार पैकी फक्त दोन जागा अपक्षांना मिळाले.या पॅनल विरोधात पाच अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.यात श्री बम्मलिंगेश्वर ग्रामविकास पॅनेलला मतदारांनी स्पष्ट बहुमत देत पुन्हा एकदा ग्रामपंचायतीची सत्ता दिली आहे.तर इकडे पाच अपक्ष उमेदवार पैकी वार्ड क्रमांक दोन मधून नितीन माने तर वार्ड क्रमांक तीन मधून कमल  वाघमोडे हे ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच विजय झाले आहेत.श्री बम्मलिंगेश्वर ग्रामविकास पॅनेलकडून एक बिनविरोध तर पाच उमेदवार निवडून आले आहेत.श्री बम्मलिंगेश्वर ग्रामविकास पॅनलने ग्रामपंचायत निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व सिध्द केल्याने सर्व विजयी उमेदवार,पॅनल प्रमुख व कार्यकर्त्यात उत्साह संचारला होता.तर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूकीत दोन अपक्ष उमेदवार निवडून आल्याने गावपातळीवर विजयी जल्लोष पाहायला मिळाला.हंजगी ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण तीन वार्डातून नऊ उमेदवार पैकी एक एसटी जागा रिक्त असल्याने आठ जागेवरच निवडणूक लागली होती.आठ पैकी श्री बम्मलिंगेश्वर ग्रामविकास पॅनलला सहा जागा तर अपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.

प्रभाग क्रमांक एक मधून

भाग्यश्री हालोळे

दयानंद कोळेकर

काशिबाई पाटील

प्रभाग क्रमांक दोन मधून

नितीन माने

चैताली शिंगे  ( बिनविरोध )

प्रभाग क्रमांक तीन मधून

विजय इंगळे

कमल वाघमोडे

विद्याराणी हडपद

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!