---Advertisement---

हन्नुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली तळवार तर उपसरपंचपदी सागर कल्याणशेट्टी यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली तळवार यांची तर उपसरपंचपदी सागर कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पहिली सभा बोलविण्यात आली होती.त्यावेळी ही निवड करण्यात आली.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून बी.एन.चव्हाण व सचिव डी.बी बिराजदार यांनी काम पाहिले.या ग्रामपंचायतीवर निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी व युवा नेते विश्वनाथ भरमशेट्टी यांच्या पॅनेलचे वर्चस्व राहिले आहे.यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य
मुक्ताबाई ढगे, शैलेश पाटील,सोनाली तळवार, सागर सिद्धप्पा कल्याणशेट्टी, श्रीकांत बकरे, गौराबाई भरमशेट्टी, गौतम बाळशंकर, नीता सोनकांबळे, जयश्री भरमशेट्टी,काशप्‍पा पुजारी, शांताबाई फसगे उपस्थित होते. नूतन सदस्यांचा आमदार सुभाष देशमुख व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार देशमुख आणि कल्याणशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार देशमुख यांनी हन्नूर गाव आदर्श करण्याचे आवाहन केले.या निवडणुकीमध्ये आमदार कल्याणशेट्टी व भरमशेट्टी एकत्र आल्याने सर्वच्या सर्व उमेदवार हे चांगल्या मतांनी विजयी झाले होते.यावेळी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख,आमदार सचिन कल्याणशेट्टी,जि.प.सदस्या मंगलताई कल्याणशेट्टी,अ.कोट न.प.चे नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी ,युवा नेते राजकुमार भरमशेट्टी,ज्येष्ठ नेते सिध्दप्पा कल्याणशेट्टी,मलिनाथ कल्याणशेट्टी,विठ्ठल भरमशेट्टी,शिवप्पा भरमशेट्टी,सोपान निक्ते,रामचंद्र भरमशेट्टी,शावरसिध्द बदिछोडे,बसवण्णा सुतार,पापु मिया जमादार,कोडीबा सोनकांबळे,राम पारतनळे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!