ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी :  ‘या’ तारखेला मिळणार दोन महिन्याचे हप्ता !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्य सरकारने “लाडकी बहीण” योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यास सुरुवात केली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. तसेच, पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू झाल्यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने मोठी घोषणा करत जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याची घोषणा केली आहे.

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा रखडलेला हप्ता आणि मार्च महिन्याचा नियोजित हप्ता एकत्रितपणे देण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थी महिलांना प्रत्येकी १५०० रुपये या प्रमाणे एकूण ३ हजार रुपयांची रक्कम ८ मार्च रोजी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी वित्त विभागाने निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे हा हप्ता वितरित करण्यात विलंब झाला. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता महिला दिनी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या घोषणेमुळे लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण असून, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत वेळेवर मिळावी, अशी मागणीही सतत केली जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!