ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री मल्लिकार्जुन हायस्कूलच्या १९९९ च्या १० वी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा,२४ वर्षांनी माजी विद्यार्थी एकवटले

 

नागनाथ विधाते

दक्षिण सोलापूर, दि.२६ : मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री मल्लिकार्जुन हायस्कूल, हत्तुरे नगर येथे १९९९ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक वैजिनाथ हत्तुरे होते. प्रमुख अतिथी धरेप्पा हत्तुरे, युसुफ शेख, पर्यवेक्षक गिरमल्ला बिराजदार, प्राथ.मुख्याध्यापक सचिन जाधव, वसंतराव सगर, सुनील घोळवे, सुधाकर कामशेट्टी, सुमन देवराळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले.माजी विद्यार्थ्यातर्फे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेतर्फे माजी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले.माजी विद्यार्थ्यांनी यावेळी स्वपरिचय करून दिला. या बॅचचे विद्यार्थी आर्मी, शिक्षक, लेक्चरर, डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, तलाटी, कॉन्ट्रॅक्टर,उद्योजक, मॅनेजर, क्लर्क, लेडीज टेलर, ट्रान्सपोर्ट, आरोग्य सेविका, पार्लर, वकील अशा मोठ्या पदावर व काही विद्यार्थी विविध क्षेत्रांत नोकरी करत आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक वैजिनाथ हत्तुरे यांनी आपल्या मनोगतात स्नेह मेळाव्याचा उद्देश सांगितला, वेळेचे बंधन पाळा, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना वेळेचे महत्व जाणणे महत्त्वाचे आहे, भावी पिढीवर उत्तम संस्कार करा, व्यायाम करा असे सांगितले आणि माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिले.हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी सारिका कुलकर्णी, विठ्ठल कुडल, गुरुनाथ आंदेवाडी, अर्चना भंगारतळगे, अर्चना कोकडे, डॉ. गोपीचंद विधाते, नवनाथ देठे, नागनाथ विधाते, जोतिबा पवार, प्रीती इटाणे, नवनाथ माने, डॉ. अभिजित कानगुडे, डॉ. राजकीरण साळुंखे, नागेश हिरेमठ, युवराज पंडीत या माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास माजी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र पाटील यांनी केले.सूत्रसंचालन श्रीदेवी पाटील यांनी केले तर आभार गुरुनाथ आंदेवाडी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!