---Advertisement---

कोरोनामुळे हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली उरुस रद्द

Follow Us:
---Advertisement---

दुधनी  : येथील हजारो हिंदू-मुस्लीम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली यांचे ऊरुस यंदा करोना विषाणू प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष मौलाली मुजावर यांनी दिली आहे.

या संदर्भात अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासकीय नियमांनुसार जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ऊरूस प्रातिनिधीक स्वरूपात केवळ धार्मिक विधी निवडक मंडळींच्या उपस्थितीत होतील. त्यामुळे भाविकांनी कोरोना प्रादुर्भाव आणि शासकीय नियम व अटींचा विचार करून कोणी दर्गाहकडे दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन ट्रस्टच्या सदस्यांनी केली आहे.

यावेळी हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली दर्गाहचे उपाध्यक्ष मुस्तफा मुजावर, शरीफ मुजावर, मलंग मुजावर, इरफान मुजावर, मूलका मुजावर, अशपाक मुजावर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!