अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
पूर्वी हृदय रोगावरील इलेक्ट्रो फिजिओलॉजी संबंधी जे आजार होते त्याच्या उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते.आता निदान तर होईलच पण उपचार सुद्धा डॉ.बसवराज सुतार यांच्या नव्या हृदयस्पंदन हार्ट केअरमध्ये अचूक पद्धतीने होतील,असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.रविवारी,फौजदार चावडी समोरील श्री जय भवानी मेडिकल शेजारी सुरू झालेल्या ‘हृदयस्पंदन’ या नव्या क्लिनिकचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,माजी नगरसेवक चेतन नरोटे,विनोद भोसले,स्वामी समर्थ कारखान्याचे अध्यक्ष संजीवकुमार पाटील,उपाध्यक्ष विश्वनाथ भरमशेट्टी,माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड,सिद्धाराम भंडारकवठे,ब्रह्मनंद सुतार आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना
खासदार शिंदे म्हणाल्या,धकाधकीच्या युगामध्ये सोलापुरात हृदय रोगाचे रुग्ण वाढत आहेत.अनेक वेळा याबतीत गुंतागुंत सुद्धा निर्माण होते.मग त्यासाठी खास पुणे,हैद्राबाद,मुंबई,बेंगलोर अशा मोठ्या शहराच्या ठिकाणी जावे लागत होते.त्यात इलेक्ट्रो फिजिओलॉजीद्वारे यावर अचूक निदान करता येईल आणि विशेष म्हणजे
कमी खर्चामध्ये प्रथमच ही सुविधा डॉ.सुतार यांनी उपलब्ध करून दिली आहे.त्याबद्दल डॉ.सुतार यांचे कौतुक केले.डॉ.सुतार हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील हन्नुरचे
असून ते एमडी मेडिसिन आणि डीएनबी कार्डियलॉजिस्ट आहेत.त्यांनी हैदराबाद येथे इलेकट्रो फिजियोलॉजिस्टमध्ये फेलोशिप मिळविली आहे. आणि ते सोलापुरात एकमेव आहेत.गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरात चांगली वैद्यकीय सेवा देत आहेत.ही बाब निश्चितच चांगली आहे,असे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
निदान आणि उपचार हे दोन्ही एकाच ठिकाणी होणार असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही.डॉ.सुतार हे सध्याही ते अनेक हॉस्पिटलमध्ये कार्डियालॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.त्यांना याबाबतीत चांगला अनुभव आहे,असे माजी मंत्री म्हेत्रे यांनी सांगितले.उपस्थितांचे स्वागत डॉ.बसवराज सुतार व डॉ.उमाश्री सुतार यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे व प्रा.निलेश भरमशेट्टी यांनी केले. तर आभार संगीता इरवाडकर यांनी मानले. या कार्यक्रमाला नरेंद्र जंगले,चंद्रकांत रोट्टे,गुरूपादप्पा बिडवे,निलप्पा घोडके, अप्पाशा भरमशेट्टी,अप्पाशा हत्ताळे,अरुण भरमशेट्टी, रमेश छत्रे,सिद्धाराम हेगडे, सोपान निकते आदींसह सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रासह हन्नूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.