ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हृदयद्रावक : विटांचा ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात : चार जण ठार !

अकोला : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच आता विदर्भातील अकोला जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळून भीषण अपघात झाला आहे. विटांच्या ढिगाखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अकोला-मंगरुळपीर रस्त्यावरील दगडपारवा गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये ट्रकमधील चार जणांचा समावेश आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विटांचा ट्रक उलटल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

अकोल्यात गडपारवा गावाजवळ विटांचा ट्रक दुचाकीवर उलटला. या घटनेत अनेकजण विटांच्या ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group