ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्रेकिंग.. माजी खासदार हिना गावितांची भाजपला सोडचिठ्ठी

 

नंदुरबार वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमधून भाजपाला मोठा धक्का बसला आहे.  अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून डॉ. हीना गावित अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी त्या आग्रही होत्या. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिंदे गट विरोधात काम करत असल्यामुळे मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मी खासदार असताना अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघात अनेक विकासाचे कामे केलेले आहेत. मी केलेल्या विकास कामांचा फायदा मला मतदार मतदानाच्या स्वरूपात देणार, मी निवडणूक लढत जिंकणार आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

आता डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे. शिंदे गट वारंवार भाजपाच्या विरोधात काम करत असल्यामुळे मी शिंदे गटाच्या विरोधात उमेदवारी करत आहे, असे हिना गावित यांनी सांगितले आहे. हिना गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसलाय.

 

त्या डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या आहेत. त्या डॉक्टर असून त्यांनी एमबीबीएस आणि एमडीची पदवी घेतली होती. हीना गावित या 2014 साली लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेल्या होत्या. त्या लोकसभेवर निवडून गेलेल्या सर्वाधिक तरुण खासदार ठरल्या होत्या. त्यावेळी हीना गावित या 26 वर्षांच्या होत्या. हीना गावित यांनी पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामगिरीने छाप पाडली होती. पंतप्रधान मोदी यांनीही हीना गावित यांचे कौतुक केले होते. 2019 मध्येही हीना गावित लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!