ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोहोळमध्ये इतिहास; २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे ठरल्या राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष

मोहोळ वृत्तसंस्था : मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या अनुभवी उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा 170 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे. अवघ्या 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे या या विजयामुळे राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्षांपैकी एक ठरल्या आहेत.

मोहोळ नगरपरिषदेच्या एकूण 20 जागांपैकी शिवसेनेने 9 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीचा भाग असतानाही स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना आमनेसामने उभे ठाकले होते. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मोहोळमध्ये शिवसेनेने मारलेली ही निर्णायक मुसंडी जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. तरुण चेहऱ्यावर विश्वास टाकत शिवसेनेने मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती होती. प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळमध्ये सभा घेत उमेदवारांच्या प्रचाराला जोर दिला होता. सिद्धी वस्त्रे यांच्यावर विरोधकांकडून टीकाही झाली होती. तब्बल 30 वर्षांनंतर वस्त्रे परिवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, पूर्वीचा विश्वास कायम ठेवत मतदारांनी पुन्हा एकदा या परिवाराला संधी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!