ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गृहमंत्र्यांचा डाव : मला तडीपार करायचं ; जरांगे पाटील

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाची लढाई सुरु केली होती. त्यानंतर अनेक घटना देखील घडल्या आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा-पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचं”, असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. बीडच्या चराटा येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी त्यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हा आरोप केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “परळी सारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला हवा. मराठा द्वेष करून चालणार नाही. पण त्यांच्या लक्षात येत नाही, त्याला मी काही करू शकत नाही. एक लाखाच्या सभेनंतर त्यांनी शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी. आता तर ९०० एकरवर सभा घेणार आहे. त्यात पुन्हा दिसेल.”

“गृहमंत्र्यांनी माझ्याबद्दल एवढा द्वेष बाळगण्याचे कारण नाही. मला तर रात्री अशी माहिती मिळाली की, मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. गृहमंत्र्यांनी स्वप्न बघायचं जरा कमी करावं. माझ्या क्लिप व्हायरल करून, मला तडीपार करण्याचं स्वप्न त्यांनी बघू नये. आता मराठा समाज तर विरोधात गेला आहेच, पण इतर समाजही विरोधात चालला आहे. मी २४ मार्चला यावर भूमिका जाहीर करणार आहे. परळीच्या सभेला जमलेल्या गर्दीवरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी हा संकेत समजून घ्यावा. त्यांचा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाही”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!