अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
माणूसकी फाउंडेशनच्या वतीने अक्कलकोट शहर व परिसरातील गरीब मुलांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आजच्या या स्पर्धेच्या युगात हे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपले कौशल्य दाखविण्यात कमी पडू नयेत म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.भविष्यातील सुसंस्कृत पिढी घडविण्याचा माणूसकी फाउंडेशनचा मानस आहे,असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.इयत्ता दुसरी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.
न प मुला मुलींची प्राथमिक मराठी शाळा नं १ येथे हा कार्यक्रम पार पडला.यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,देसाई आय क्लिनिकचे डॉ. सागर पवार,वैभव नवले आदी उपस्थित होते.यावेळी माणूसकी फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत क्षीरसागर, उपाध्यक्ष आकाश शिंदे, सचिव आशिष हुंबे,योगेश महिंद्रकर,देविदास गवंडी, आकाश सुर्यवंशी मुख्याध्यापिका तडकल, इस्माईल जमादार,प्रवीण साठे आदि उपस्थित होते.माणूसकी फाउंडेशनच्या या उपक्रमात मोलाची साथ देऊन पुढील प्रगत पिढी घडविण्यास हातभार लावलेल्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.नंदकुमार काटे,अनुप महाराज पुजारी,विक्रम चोरगे, , सुयोग शहा, मंदार नार्वेकर,योगेश बाबर,राहुल धस,छोटू यादव,अमित चव्हाण,संदीप रसाळ,राकेश कानडे,बाबुशा भालके,प्रज्योत अचलेर,सचिन पवार,धनाजी वणवे,महादेव पवार,संदीप वाले, विनय जाधव यांचे सहकार्य लाभले.