सोलापूरच्या हुरडा पार्टीची नागपुरात रंगत
हुरडा प्रेमी मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने नागपुरात जंगी हुरडा पार्टी
सोलापूर वृत्तसंस्था
मुंबईचे लोकप्रिय नेते ना मंगल प्रभात लोढा यांचे सोलापूरच्या हूर्ड्याचे खास आकर्षण असते. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री महोदय आमदार, राज्यभरातील पत्रकार, उद्योजक, अधिकारी यांच्यासाठी ते स्वतः हुरडा पार्टी आयोजित करतात. यासाठी सोलापुरी हुरडा घेऊन या असे त्यांचे खास आग्रह असतो.
18 डिसेंबर रोजी नागपूर येथील फॅमिली कोर्ट पत्रकार निवास भवन मैदान येथे भव्य हुरडा पार्टी झाली. यासाठी ड्रीम फाउंडेशन संचलित बसव संगम शेतकरी गट उत्पादित सोलापूरची प्रसिद्ध कवळा हुरडा फुले मधुर, गुळभेंडी, प्रसिद्ध शेंगा चटणी, गावरान बोर, सेंद्रिय गूळ, स्पेशल फरसाण, तिळगुळ, कडक भाकरी, शेंगा पोळी सोलापूर येथून घेऊन आम्ही नागपूर येथे जाऊन सेवा दिले. ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक व हुरडा किंग काशीनाथ भतगुनकी यांच्या नेत्तृत्वाखाली युवा शेतकरी परमेश्वर भतगुनकी, व्यंकटेश तिम्मापुर, सागर कोळी, अशोक कांबळे यांच्यासह 7 जणांची टीम 500 हून अधिक लोकांना बुधवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 यावेळी कणीस अगटी भाजून दिले.
मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना अजित पवार, विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर, बिजेपी अध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्यासह ना पंकजा मुंडे,ना माधुरी ताई मिसाळ,ना नितेश राणे, मा गोपीचंद पडळकर, मा आशिष शेलार, मा सदाभाऊ खोत, मा अमोल मिटकरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहून हूर्ड्याचा आस्वाद घेतले.
संयोजक श्री मंगल प्रभात लोढा साहेब स्वतः सरांचे स्वागत करून हुरडा खाण्यासाठी आग्रह केले. उपस्थित लोकांना 250 हुरडा कीट ड्रीम फाउंडेशन देण्यात आले. या हुरडा पार्टीसाठी 65 किलो कणीस,110 किलो हुरडा दाणे, 30 किलो शेंगा चटणी,10 किलो गूळ , गावरान बोर, सोलापूर येथून घेऊन जाण्यात आले. हुरडा पार्टी सोबत गावरान जेवण व गीत संगीत मेजवानी होती.
मुख्यमंत्री व मान्यवरांना हुरडा कीट भेट देऊन शेतकरी ते ग्राहक थेट हुरडा पार्टी उपक्रम उद्घाटन करण्यात आले. सोलापूरच्या हुर्ड्याचे जागतिक ब्रॅण्डिंगसाठी ड्रीम फाउंडेशन प्रयत्न करत असून लवकरच मुंबई आणि दिल्ली येथे हुरडा महोत्सव भरविण्यात येणार असल्याचे भातगुनकी यांनी सांगितले.