ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मला कधीही अटक होण्याची शक्यता ; जरांगे पाटील

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचे गृहमंत्री अमित शहा आज राज्याच्या दौऱ्यावर असतांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील सरकार विरोधात लढा देत आहे तर त्यांनी नुकतेच एक मोठे विधान देखील केले आहे.

जरांगे पाटील म्हणाले कि, सत्तेत मी काटा आहे, मला कधीही अटक होण्याची शक्यता असून, त्याबाबत अहवाल देखील तयार आहे, तर न टिकणारे दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देण्यात आले आहे. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू आहेत. सरकारने आमची फसवणूक केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्यासाठी तयारी सुरु असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की, मराठ्यांनी इतरांना आडवे करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. समाजाचा निर्णय हा अंतिम राहील. लोकसभेला जे उमेदवार पन्नास-साठ हजार उभे राहतील तो त्यांचा अधिकार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य त्यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमचेच काही आमदार आहेत. माझी माहिती त्यांना पुरवीत आहेत. आज त्यांचे नाव मी घेणार नाही, पण असे 36 आमदार आहेत. सत्ता आणि मराठ्यातला मी काटा आहे. म्हणून मला बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू आहे. गुन्हे दाखल करताय, आज आमच्यावर वेळ आहे. उद्या हीच वेळ तुमच्यावर येणार आहे. कितीही दबाव येवू द्या, मराठा एक इंच देखील मागे हटणार नाही.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी पुन्हा हक्क देईल, पुन्हा आपल्याला आंतरवाली सराटी येथे एकत्र यावं लागेल. ताकद दाखवायची वेळ आली तर पुन्हा एकदा एकत्र या. मी मुख्यमंत्र्यां सांगितले की गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा जरांगे यांनी दिला. मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही त्याचा लाड केला, उलट मी म्हणतोय आम्ही तुमचा लाड केला. तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला तर आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो असाही टोला जरांगे यांनी लगावला आहे. मुंबईमध्ये 36 आमदार एकत्र बसले आणि तिथे अस ठरले की याला 10 टक्के आरक्षण घ्यायला लावा, नाहीतर याला गुंतवा. सरकारने गोडी गुलाबीने आरक्षण द्यावे, आमच्या नादी लागू नये. मला जेलमध्ये टाकले तरी मी जेलमध्ये मोर्चा काढील असे आव्हानच जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!