ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“राजकारणात मला संपण्याचा प्रयत्न झाला पण मी टिकलो ; माजी मुख्यमंत्री चव्हाण !

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सातत्याने काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. कधीकाळी काँग्रेसची विचारधारा मराठवाड्यात रुजवणारे नेते म्हणून अशोक चव्हाण यांची ओळख होती. मात्र आता एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेसवर सडकून टीका करत त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

अशोक चव्हाण लातूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस तसेच विरोधकांच्या आघाडीवर टीका केली. “राजकारणात मला संपण्याचा प्रयत्न झाला, मात्र मी टिकलो. खोट्या आरोपांमुळे काँग्रेस सोडलं. 2010 मध्ये माझ्यावर निष्कारण खोटे आरोप करण्यात आले. त्यावेळी मला मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. 2008 ते2010 हा माझ्या कारकिर्दीतील शिखराचा काळ होता. पण कुठलीही चूक न करताही मला 14 वर्ष वनवास भोगावा लागला, “असे अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळ्याबाबत उल्लेख कर सांगितले.

यावेळी अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर तोफ डागली, तर भाजपची स्तुती केली. भाजपने आपल्याला सन्मानाने पक्षात प्रवेश दिला त्यामुळे आपण आज खासदार असल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले.

पुढे ते म्हणाले, लातूरकरांनी धक्का तंत्र वापरत आमदार रमेश कराड यांना लातूर ग्रामीणमधून निवडुण आले लातूर जिल्ह्यातल्या सहा पैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे, असे गौरवोद्गार अशोक चव्हाण यांनी यावेळी काढले. तसंच मतचोरीवरून आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनाही त्यांनी सुनावलं. मतचोरी झाली असती तर नाना पटोले अडीचशे मतांनी जिंकले असते का? असा सवाल अशोक चव्हाणांनी उपस्थित केला.

अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. काँग्रेसमध्ये असताना ते मुख्यमंत्री राहिले होते. मात्र त्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यावरूनच त्यांनी लातूरमधील सभेत भाष्य केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!