मुंबईत रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण इमारत होणार सील, मुंबईतील रहिवासी इमारतींबाबत नवी नियमावली
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जात आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत काल आठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई महापालिकेने शाळा बंद ठेण्याच्या निर्णयानंतर आता रहिवाशी इमारतींविषयी नियम जारी केला आहे. जर कोरोना रुग्ण आढळून आल्यास पूर्ण इमारत सील करण्याबाबत महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईतील रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण विंग किंवा इमारत सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.