मुंबई : वृत्तसंस्था
नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. सोन्याने दोन दिवसात नरमाईचा सुरू आवळला. तर तिसर्या दिवशी सोन्याने डबल धमाका केला, किंमत इतकी वाढली की ग्राहकांचा काळजा ठोका चुकला. चांदीने सध्या दिलासा दिला. चांदीत या तीन दिवसात दरवाढ केली नाही.
सोन्याने मागील दोन आठवड्यात 3000 रुपयांची भरारी घेतली. या सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे 170 आणि 320 रुपयांची घसरण झाली होती. बुधवारी 29 जानेवारी रोजी सोन्याने 920 रुपयांचा धमाका केला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 76,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 83,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पंधरवाड्यात चांदी 4 हजार रुपयांनी महागली होती. त्यानंतर 18 ते 23 जानेवारीपर्यंत भावात बदल झाला नाही. तर 24 जानेवारीला 1 हजार रुपयांनी चांदी महागली होती. 27 जानेवारी रोजी त्यात 1 हजार रुपयांची घसरण झाली. दोन दिवसात कोणताही बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.