ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नदीकाठच्या गावांचे तातडीने पंचनामे करा, दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांची मागणी

अक्कलकोट : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात व अक्कलकोट तालुक्यात पडलेल्या अतिवृष्टी पावसामुळे कुरनूर धरण यंदा ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाची धोका ओळखून दररोज खाली पाण्याचा विसर्ग सुरू ठेवल्याने नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात यंदा पूराचा फटका बसला आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली व शेती खरडून गेली विजेचे खांब पडले. शेतातील पिके संपूर्ण जमीनदोस्त झाले. अनेकांचे घरेही पडले. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांची भेट घेऊन केली आहे.

नदीकाठच्या गावांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावे, अशा प्रकारचे निवेदन त्यांना दिले. यावेळी तहसीलदार शिरसट यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही संबधित अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले असून येत्या काही दिवसांत पंचनामे सुरू होतील व शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळेल असा शब्द दिला.

यावेळी पंचायत समितीचे सभापती अँड.आनंदराव सोनकांबळे, तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, नगरसेवक डॉ. उदयकुमार म्हेत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!