ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माळशिरसमध्ये माजी आ.सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा विजय !

सोलापूर : वृत्तसंस्था

छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी उत्साहात मतदान केले. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ६८.२८% मतदान झाले, तर मतमोजणी सकाळी १० वाजता सुरु झाली आहे.

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील ७३१ गटांसाठी जिल्हापरिषद आणि १,४६२ गटांसाठी पंचायत समित्यांमध्ये एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य आज काही तासांत ठरणार आहे.

सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माळशिरस तालुक्यातील चुरशी गटाच्या निकालानुसार भाजपच्या माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा विजय झाला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या कुटुंबातील चिरंजीव जीवन जानकर यांना पराभूत केले. राज्यभरातील मतदारांचा सहभाग आणि उत्साह या निवडणुकीला महत्त्वपूर्ण ठरला असून, मतमोजणीच्या निकालाची दृष्टी राज्याच्या राजकीय तळाशी चर्चेला चालना देईल, अशी अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!