ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादीच्या शिबिरात शरद पवारांचा आगामी निवडणुकीसाठी मोठा प्लान

शिर्डी : वृत्तसंस्था

‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून ठरावीक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता, खासगीकरण असे मुद्दे घेऊन यापुढे धोरण ठरवले जाणार आहे. येत्या निवडणुकीत सहकारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा विश्वास खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात समारोपाच्या भाषणात खासदार पवार बोलत होते. मंचावर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. पवार म्हणाले, भाजप ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असे सांगतो. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, पंजाबमध्ये भाजप नाही, गोवा, मध्य प्रदेशातील सरकार भाजपने पाडले. ४१५ म्हणा किंवा ५०० म्हणा, आज देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही. जनमानसातून योग्य पर्याय दिला, तर त्यास जनतेचा नक्की पाठिंबा मिळेल. शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा दावाही त्यांनी केला.

मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ होते त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का होण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. भाजपच्या हातात सत्ता आहे. त्याशिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची यंत्रणा होती, तसे काम भाजपने सुरू केले असल्याचे पवार यांनी म्हटले. खासदार पवार पर पुढे पुढे म्हणाले, म्हणाले, भाजपने फसवणूक केल्याचे लोकांना समजू लागले आहे. आपल्या हातात सत्ता आल्यानंतर भाजपने अनेक घोषणा केल्या; मात्र त्या पूर्ण केल्या नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!