अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहरासाठी एवढ्या मोठया प्रमाणात निधी कधीच प्राप्त झाला नाही. नविन बस स्थानक, मल्लिकार्जुन मंदिर रजि.ऑफीस, भुमिगत गटार, मोठी रस्ते, मोठया प्रमाणात विकास कामे चालू आहेत. अक्कलकोट शहर झपाट्याने बदलत आहे.यासाठी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी, प्रभाग क्र. १ चे उमेदवार तम्मा शेळके ,सुनंदा श्रीशैल स्वामी यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
प्रभाग क्र १ भाजपाचे उमेदवार तम्मा शेळके , सुनंदा श्रीशैल स्वामी यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी, महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,उत्तम गायकवाड, रामचद्र समाणे, शिवशरण जोजन, यशवंत धोंगडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी इरण्णा गवंडी, श्रीशैल गवंडी, चंद्रकांत गवंडी, परमेश्वर शिंदे, सिद्धराम घाटकांबळे, अनिल मोरे, रफिक पालंडे, बाळू खैराटकर, वरूण शेळके , रमेश शंबेवाड , संजय जमादार , आप्पा शिंदे , किरण शिंदे , बाजीराव जाधव , वसंत बंडगर , बाबा सुरवसे ,पिंटू गायकवाड, अनिल लोणारे, सुहास सुरवसे, आदींसह मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.