ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमीची मागणी

अक्कलकोट नगरपरिषद व तहसीलदार यांना निवेदन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शीलवंत व पंचम समाज बांधव अक्कलकोट यांच्यावतीने करण्यात आली. या संदर्भात नगरपरिषद प्रशासन संचलनालय, मुंबई यांच्या पत्रानुसार अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके व तहसीलदार विनायक मगर यांना समाजाकडून निवेदन सादर करण्यात आले.

समाजाच्या प्रतिनिधींनी निवेदनात  नमूद केले की, अक्कलकोट परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमीची आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जागांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याने समाज बांधवांना अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नगरपरिषद व महसूल प्रशासनाने तत्काळ जागेची पाहणी करून रुद्रभूमीचे आरक्षण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष प्रशांत लोकापुरे, सत्यजित लोके, दत्ता साखरे, शिवकुमार कापसे, प्रमोद लोकापुरे, स्वामीनाथ धनशेट्टी, नीलकंठ कापसे, विलास कोरे, राजशेखर हिप्परगी, मल्लिकार्जून आळगी, कांतु धनशेट्टी, गजानन पाटील, अप्पू रोडगे, वीरेंद्र पाटील, लक्ष्मण समाणे, दयानंद बिडवे, दयानंद रोडगे, राजू थंब, शिवलिंग कलबुर्गी, मल्लिनाथ खुबा, प्रितीष किलजे, सुनिल दसले, शिवशरण इचगे, संतोष जमगे, रितेश लोकापुरे, संजय कोठे, संजय लोकापुरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. समाजाने दिलेल्या निवेदनावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि लवकरात लवकर रुद्रभूमीची जागा निश्चित करावी, अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!