दिल्ली : न्यूझीलंड दौर्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा सहित विराट कोहली आणि के. एल. राहुल यांना विश्रांती दिल्यामुळे भारतीय संघाचे हंगामी कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदी यष्टीरक्षक रिषभ पंत असणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी संघातील ज्येष्ठ खेळाडू शिखर धवन कडे पुन्हा एकदा नेतृत्व सोपवण्यात आले असल्याची घोषणा आज निवड समितीने केली आहे. तर, रोहित शर्मा हा बांगलादेश सोबत होणाऱ्या T20 आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे. दरम्यान भारतीय जलदगती गोलंदाज उमरान मलिक हा न्यूझीलंड दौर्यावर भारतीय संघात पुनरागमन करण्यास सज्ज आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उप कर्णधार /यष्टी रक्षक), शुभमन गील, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टी रक्षक),वाशिंगटन सुंदर शार्दुल ठाकूर, शाबाज अहमद,यजुरवेंद्र चहल,कुलदीप यादव, अरश्दीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
न्यूझीलंड विरुद्ध टी-२० साठी भारतीय संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार) ऋषभ पंत (उप-कर्णधार यष्टी रक्षक) शुभमन गील, इसगण किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुरवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्षदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शिराज, भुवनेश्वर कुमार.
बांगलादेश विरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार) के एल राहुल, (उपकर्णधार- यष्टी रक्षक ) शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद शिराज,दीपक चहर, यश दायली.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार) के एल राहुल (उप-कर्णधार) शुभमन गील, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत ( यष्टी रक्षक), के. एस. भरत (यष्टी रक्षक), रविचंद्र अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद शिराज, उमेश यादव.