ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारताचे भावी पंतप्रधान मोदीच असतील ; मंत्री हसन मुश्रीफ !

कोल्हापूर : वृत्तसंस्था

राज्यात महायुती सरकारला मोठा हादरा बसण्याचा अंदाज सी व्होटरच्या जनमत चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी विस्कळीत दिसत असतानाही एक प्रकारे बूस्टर डोस मिळेल, अशी आकडेवारी समोर आली आहे. याबाबत थेट विचारले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणीच अडवू शकत नाही. तेच भारताचे भावी पंतप्रधान असतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, आजपर्यंत निवडणुकीसंदर्भात अनेक पोल येऊन गेले आहेत, मात्र अनेक वेळा प्रत्यक्षात तसे घडलेले आपण पाहिलेले नाही. कुणाचा पोल काही असो, मात्र २०२४ मध्ये मोदींना कोणी आडवू शकणार नाही. नुकत्याच झालेल्या राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण या चार राज्यांतील निवडणुकांचे पोलही असेच खोटे ठरले आहेत. त्यामुळे सी व्होटरच्या चाचणीमध्येही फरक पडणार आहे. दरम्यान, सरकारने प्रचंड निर्णय घेतले आहेत. विरोधकांचे काम आहे टीका करणे, मात्र आम्ही काम करत राहू, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सरकारला पॉलिसी पॅरॅलिसीस झाला आहे,’ अशा केलेल्या टीकेला मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले.

प्रोत्साहनपर अनुदानाबाबत ते म्हणाले, एका वर्षी दोनवेळा पीक कर्ज घेतले आहे. ही तांत्रिक बाब आली आहे. मात्र पात्र-अपात्र ठरलेल्या सर्वांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल, अशी आपल्याला खात्री आहे. छगन भुजबळ यांच्याबाबत कोणतीही प्रतिक्रीया आपण देणार नसल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!