अक्कलकोट, दि.१२ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २२५० रूपये प्रमाणे रक्कम अदा केले असल्याचे कारखान्याचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दास अनुसरून कारखान्याकडून बिल वेळेवर अदा करण्यात येत आहे. यासोबतच वाहतूकदार,ठेकेदार यांचीही बिले अदा केल्याचे माने देशमुख यांनी सांगितले. जयहिंद शुगरकडून नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. २६५ वाण असलेल्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना २ हजार २११ रुपयांची पहिली उचल दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षीही दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस बिल अदा केल्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक बब्रुवान माने देशमुख, व्हा.चेअरमन विक्रमसिंह पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर.पी देशमुख, शेतकी अधिकारी जेऊरे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सहकार्य करावे
१५ नोव्हेंबरपर्यंत पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे ऊस बिल अदा केले आहे. यंदाचा गाळप हंगाम यशस्वीपणे सुरू असून दररोज साधारणतः ९००० मेट्रिक टन गाळप होत आहे. शेतकऱ्यांनी परिपक्व ऊसाचा पूरवठा कारखान्यास करावा.यातुन कारखान्याच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळेल : गणेश माने देशमुख ,चेअरमन जयहिंद शुगर