मुंबई : मुंबईतील काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दिकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
राज्यात काँग्रेसची अवस्था मागील दोन निवडणुकीत बिखट झाली आहे. मात्र महाविकास आघाडी निर्माण झाल्याने काँग्रेसला सत्तेत सहभागी होऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचे एक सुवर्णसंधी मिळाली आहे. मात्र अंतर्गत वादामुळे पुन्हा एकदा ते चव्हाट्यावर आले आहे.
आमदार झीशान सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांच्या विरोधात आरोप केले आहेत. पक्षाच्या अध्यक्ष माझ्या विरोधात कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप सिद्दिकी यांनी भाई जगताप यांच्यावर केला आहे.
माझ्यासोबत काम करणाऱ्यांना बजावले जात आहे. आणि माझ्या विरोधात काम करणाऱ्यांना ताकद दिली जात असल्याचा आरोप काँग्रेस आमदार झीषण सिद्दिकी यांनी केला आहे.