ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळा येथे जागतिक महिला दिवस उत्साहात

दुधनी दि. ०९ : येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेत जगतीक महिल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथि म्हणून शांभवी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष्या वैशाली शंकर म्हेत्रे तर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुहासिनी गद्दी होत्या. यावेळी विद्यार्थिनीनि कविता वाचन, भाषण आणि विविध कलागुण सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.

कार्यक्रमाचे सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त माता भगिनींचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आले. यावेळी वैशाली म्हेत्रे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजच्या महिला सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. ते पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे. त्यांना कमी लेखण्याचे गरज नाही असे त्या म्हणाल्या. शाळेत मुलींना कोणत्याही प्रकारची सुविधांचे गरज असेल तर फाउंडेशन मार्फत करू, अशी ग्वाही म्हेत्रे यांनी दिले.

यावेळी मल्लम्मा कल्लुर, लक्ष्मी काळे, दिपीका बंद्राड, प्रेमा पादी, कस्तुरीबाई माशाळ, सविता कुंभार, कविता कोटणुर, सिद्धम्मा हिरोळी, रेणुका कलाल, सुरेखा कोगनुरे, महादेवी सोलापूर यांच्यासह माता भगिनी मोठ्या संख्येने उपास्थित शिक्षिका विद्या चिंचुरे, ज्योती चनशेट्टी, भाग्यश्री कोष्ठी, रेखा जगदाळे, सुजाता हीरोळी, बंगी मॅडम, कलावती अरसगोंड होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्र प्रमूख सुरेश शटगार, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले. सूत्र संचलन सिद्धाराम चौधरी तर संतोष जोगदे यांनी आभार मानले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!