---Advertisement---

हन्नूर येथील अनंत चैतन्य प्रशालेत महिला दिन उत्साहात

Follow Us:
---Advertisement---

कुरनूर दि.१० : अक्कलकोट येथील अनंत चैतन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, हन्नूर येथे जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन स्वरुपा कल्याणशेट्टी व सरपंच सोनाली तळवार यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वरुपा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सर्व महिला अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत सदस्या यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी वाघेश्वरी काळजाते व राणी तेली यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संस्कृतिक विभाग उपप्रमुख स्वप्नाली जमदाडे यांनी आपल्या मनोगतातून महिलांनी सर्व क्षेत्रात आपली योग्यता सिद्ध केली असून कुठल्याही परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात तिने आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. महिलाही अबला नसून सबला आहे. तिला कुटुंबाची आणि पुरुषाची साथ मिळाली तर ती यशस्वी भरारी घेऊ शकते, असे विचार याप्रसंगी व्यक्त केले.

या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व महिला सदस्या, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चप्पळगाव मॅडम व आभार प्रदर्शन स्वामी मॅडम यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!