मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यावर येवून ठेपली असतांना राज्यात मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय देखील जोरदार चर्चेत असतांना नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी थेट भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, सरकारने मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला तर भाजपची नागपूरची जागा येणार नाही, असा इशारा त्यांनी गुरुवारी सत्ताधारी भाजप विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. माझ्या नादाला लागू नको, मी तुझा शत्रू नाही, असेही ते यावेळी फडणवीसांवर शरसंधान साधताना म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गुरुवारी 1 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, मराठा समाज एकजूट होत नाही असा आरोप आतापर्यंत केला जात होता. पण 29 ऑगस्ट 2023 रोजी मराठा समाजाने एक डरकाळी फोडली आणि त्याचा आवाज संबंध महाराष्ट्रात पोहोचला. त्या दिवशी मराठा समाज आपल्या हक्कासाठी एकत्र आला. आज आमचे मराठा कुटुंब एक झाले असून, त्यांची एकजूट कुणीही फोडू शकत नाही.
मनोज जरांगे यांनी यावेळी भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आगपाखड केली. ते म्हणाले की, मला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न झाला तर आगामी निवडणुकीत यांना साफ करून टाकील. ग्रामपंचायतीवरही त्यांचा एकही सदस्य आम्ही निवडून येऊ देणार नाही. माझ्या नादाला लागू नको. मी तुझा शत्रू नाही. फार तर ते मला तुरुंगात डांबतील. त्यानंतर आम्ही इथे बसायचे तर तुरुंगात जाऊन बसू. यापेक्षा अधिक काहीही होणार नाही. पण खरेच असे झाले तर राज्यात भाजपची एकही जागा येणार नाही. एवढेच नाही त्यांची नागपूरची जागाही निवडून येणार नाही.